‘त्या’ पोलिसांचा शासनाकडून होणार गौरव

पिंपरी – धार्मिक, वंशिक व जातीय सलोखा राखण्यासाठी ज्या पोलिसांनी 2018 या वर्षात विशेष प्रयत्न केले आहेत. अशा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालयांकडून शिफारशी मागवल्या आहेत.

समाजात तेढ निर्माण झालेल्या प्रसंगात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता शांतता निर्माण करण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचा दिल्ली येथे 2 ऑक्‍टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त आयोजीत कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते “कबीर’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर शिफारशी देण्याचे आवाहन पोलीस महासंचालकांनी केले आहे.

-Ads-

हा पुरस्कार तीन भागात विभागलेला असतो. ग्रेड एक, दोन, तीन अशी विभागणी असून अनुक्रमे दोन लाख, एक लाख व 50 हजार रुपये रोख अशी रक्कम देण्यात येणार आहे. तसेच पुरस्कारार्थीचे नाव सन्मानपूर्वक राजपत्रामध्ये प्रसिद्ध केले जाते. यापुढेही पोलिसांनी सामाजिक सलोखा राखण्यासाठी असेच काम नियमीत करावे यासाठी हा पुरस्कार प्रोत्साहन म्हणून दरवर्षी दिला जातो.

या शिफारशी केंद्र सरकारकडे पाठवल्या जातात. यावेळी कर्मचाऱ्यांना शिफारशी सोबत विहीत नमुन्यात इंग्रजीत उदाहरणासह (सायटेशन) व चारित्र्य तपासणीच्या दोन प्रतीही जोडाव्या लागणार आहेत. तसेच पुरस्काराची व त्याच्या नियमावलीची सर्व माहिती ही शासनाच्या संकेत स्थळावर देखील उपलब्ध आहे. पुुण्यामध्येही मराठा मोर्चा, भीमा कोरेगाव प्रकरण अशा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रसंगात अनेक पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या पुरस्कारांच्या वेळी त्यांचाही नक्की विचार केला जाणार आहे. मात्र त्यासाठी संबंधीत पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळेत अर्ज करणे गरजेचे असल्याचे आदेशात नमूद आहे.

शहरातील कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत
पूर्वी पिंपरी-चिंचवड शहराचा कारभार पुणे पोलीस आयुक्‍तालयातून चालायचा. अशावेळी चमकदार कामगिरी करुनही पिंपरी-चिंचवडमधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यात पोलीस आयुक्‍तालयाकडून कुठेतरी दुजाभाव व्हायचा. मात्र, आता शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालय झाले आहे. पोलीस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांचे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष आहे. त्यामुळे यापुढे तरी कामाची दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी खासगीत बोलताना व्यक्त करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)