“त्या’ पाच बांग्लादेशींच्या पोलीस कोठडीत वाढ

पुणे – बांग्लादेश येथील अन्सारउल बांग्ला टिम या दहशतवादी संघटनेमध्ये सक्रिय असलेल्या पाच बांग्लादेशी नागरिकांच्या पोलीस कोठडी पाच एप्रिलपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे.

मोहंमद हबीबीऊर रहमान ऊर्फ राज जेसुब मंडल (वय31, वानवडी), मोहंमद रिपन होस्सैन (25, रा. आकुर्डी), हनान्न अन्वर हुसेन खान (25, रा. आकुर्डी), मोहंमद अझर अली मोहंमद सुभानअल्ला ईस्लाम (30, रा. अंबरनाथ), मोहंमद हसनअली मोहंमद अमील अली (24, महाड, जि. रायगड, सर्व मु.रा.बांग्लादेश) अशी पोलीस कोठडीत वाढ केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून सात मोबाईल, 34 सिमकार्डची मोकळी पाकिटे, चार आधारकार्ड, पॅनकार्ड आणि एक टीबीची हार्डडिस्क जप्त करण्यात आली आहे. सदर हार्डडिस्क सायबर लॅबमध्ये तपासणीकरिता पाठविण्यात आली आहे.

आरोपी मोहंमद इस्लाम याने अन्सारउल बांग्ला टिमच्या सक्रिय सदस्यांना वेळोवेळी रोख रक्कम दिलेली असून, त्या नेमक्‍या कोणाला दिल्या आहेत याचा तपास करण्यात येत आहे. तसेच, आरोपी आणि बांग्ला टिमचे सक्रिय सदस्य भारतात वेगवेगळ्या राज्यात गेले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ते कोठे गेले, कोणाकोणास भेटले याची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली; तर बचाव पक्षातर्फे ऍड. कायनात शेख, ऍड. तौसिफ शेख आणि ऍड. स्वप्नील गिरमे यांनी काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)