“त्या’ पाचजणांच्या नजरकैदेत 12 सप्टेंबरपर्यंत वाढ

नवी दिल्ली – नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी अटक केलेल्या पाचही विचारवंतांची नजरकैद सर्वोच्च न्यायालयाने वाढविली आहे. या विचारवंतांना 12 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे.

कवी वरवरा राव, ऍड. सुधा भारद्वाज, ऍड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलाखा या पाच जणांना नक्षली संबंधावरून अटक करण्यात आली होती. मात्र त्यांना कोठडीत ठेवण्यास नकार देत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या पाचही जणांच्या स्थानबद्धतेची मुदत आज संपल्याने पोलिसांनी त्यांना पुन्हा कोठडी देण्याची मागणी न्यायालयात केली. मात्र त्यांची ही मागणी फेटाळून लावण्यात आली. न्यायालयाने या पाचही जणांच्या स्थानबद्धतेत

12 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे या पाचही जणांना दिलासा मिळाला आहे. पुण्यात आयोजित एल्गार परिषदेच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात बेकायदेशीर प्रतिबंधक हालचाली कायद्यासह विविध कलमांनुसार त्यांच्याविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पाच जणांना पूर्वी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आढळलेल्या ईमेलमध्ये या पाच जणांची नावे समोर आली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)