“त्या’ पक्षाची मक्‍तेदारी मोडीत काढणार

– आमदार महेश लांडगे यांचा इशारा : भारतीय जनता माथाडी जनरल कामगार आघाडी शाखेचे उद्घाटन
रांजणगाव गणपती – रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यांच्या माध्यमातून स्थानिक कामगार आणि उद्योजक-व्यावसायिकांना बळ देण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील एकाच पक्षाची मक्तेदारी मोडीत काढण्याचा इशारा देखील यावेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भाषणात दिला आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीत भारतीय जनता माथाडी जनरल कामगार आघाडी शाखेचे उद्घाटन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
कामगारांच्या हक्काचा पैसा कामगारांना मिळण्यासाठी भाजप सरकार प्रयत्नशील राहणार आहे. याआधी ही पैसा काही नेत्यांकडून आणि पक्षांकडून राजकारणासाठी वापरला जात होता. यापुढे असे होऊ देणार नसल्याचा इशारा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी रांजणगाव येथे दिला. स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी भाजप आग्रही राहणार असल्याचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे, भारतीय जनता माथाडी कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भोंडवे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विशाल लायगुडे, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान शेळके, हवेली भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रोहिदास उंद्रे ,भाजप जिल्हासंर्पक प्रमुख ऍड धर्मेंद्र खांडरे, शिरूर पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, पुणे प्रादेशिक बाजार समितीचे संचालक बाळासाहेब चव्हाण, शिरूर बाजार समितीचे संचालक संतोष मोरे, शिरूर खरेदी-विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनवणे, आबासाहेब थोरात, भाजपचे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष विशाल घायतडक, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिलीप हिंगे, शिरूर तालुका भारतीय जनता माथाडी कामगार जनरल कामगार आघाडीचे अध्यक्ष आणि नगरसेवक नितिन पाचर्णे, शहराध्यक्ष केशव लोखंडे, उद्योगपती राजेश लांडे, पुणे जिल्हा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्‍याम गावडे, वाघाळे गावचे सरपंच बबनराव शेळके, बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड, डॉ.राजेंद्र ढमढेरे, राजाभाऊ मांढरे, सणसवाडीचे माजी उपसरपंच बाबासाहेब दरेकर, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष रघुनंदन गवारे, सचिन पलांडे, दत्ता हरगुडे, हर्षल जाधव यांच्यासह विविध मान्यवर आणि कामगार वर्ग उपस्थित होता. यावेळी सूञसंचलन भाजपचे तालुका सरचिटणीस गोरक्ष काळे यांनी केले. तर, आभार नितीन पाचर्णे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)