‘त्या’ नुकसानीची होणार शाहनिशा

पुणे – कालवा फुटून बाधित झालेल्या कुटुंबांची महसूल प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार 730 कुटुंबे बाधित झालेली असून, यापैकी 90 घरे पूर्णत: व 650 घरांचे अंशत: नुकसान झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर काही बाधित पंचनाम्यांपासून वंचित राहिल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार पुन्हा 300 कुटुंबांचे पंचनामे करण्यात आले आहेत. खरेच यांचे नुकसान झाले आहे का, त्याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गिरीश बापट यांनी बैठक घेऊन कालवा दुर्घटनेतील आर्थिक मदतीचा आढावा घेतला. दांडेकर पूल परिसरात मुठा उजवा कालवा फुटल्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या बॅंक खात्यामध्ये मंगळवारपासून आर्थिक मदत जमा होणार आहे. यासाठी राज्य शासनाने 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)