‘त्या’ निष्पाप पिल्लासाठी त्यांनी लावली जान कि बाजी

पुणे – अग्निशमन दलाचे जवान आग व आपत्तीविषयक कर्तव्य बजावतातच; पण अशा काही घटना घडतात की, हे जवान जीवाची बाजी लावून एखाद्याचे प्राण वाचवतात. मग, तो मनुष्य असो की प्राणी. अशीच एक घटना गुरुवारी (दि. 29) दुपारी 4 वाजता कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राशेजारी घडली. तिथे शेजारीच असणाऱ्या पाण्याच्या खाणीमध्ये एक शेळीचे पिल्लू पाण्यात पडलेले असून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे जवानांनी पाहिले.

त्याचवेळी कोणी ही या घटनेबाबत वर्दी दिली नसली तरी, कर्तव्य म्हणून या जवानांनी दलाच्या नियंत्रण कक्षाला ही बाब कळविली व प्रयत्न सुरू केले. जवान मंगेश टकले व मनोज गायकवाड यांनी तातडीने लाईफ जॅकेट परिधान करून शिडीच्या साह्याने किमान 50 फुट खोल असणाऱ्या या खाणीत उतरून पोहत जाऊन या शेळीच्या पिल्लाची 15 मिनिटात सुखरूप सुटका केली. स्वत: जवानांनीच याबाबत समाधान व्यक्त केले. या कामगिरीमधे फायरमन अजित बेलोसे, मंगेश टकले, रवी बारटक्के, मनोज गायकवाड, मनोज भारती, निलेश राजीवडे, हर्षद येवले आणि चालक सुखदेव गोगावले यांनी सहभाग घेतला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)