‘त्या’ निवृत्त जवानाचे कुटुंब संपवणारा मुख्य आरोपी अटकेत

अहमदनगर : अहमदनगरमधील शेवगावमध्ये निवृत्त जवानासह कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी  अटक केली आहे. आरोपी परसिंग भोसलेला अटक करण्यात आली आहे.

अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातल्या आखणी गावातून परसिंगला ताब्यात घेण्यात आले. तो चार जिल्ह्यांमध्ये वाँटेड होता. आबासाहेब हरवणे कुटुंबातील चौघांच्या हत्याकांडाप्रकरणी आतापर्यंत पाच आरोपी अटकेत आहेत. दरोड्याच्या उद्देशाने हरवणे कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक कबुली आरोपींनी दिली होती. 17 जूनला शेवगावात राहणारे 57 वर्षीय आप्पासाहेब हरवणे, त्यांची पत्नी सुनंदा हरवणे, मुलगी स्नेहल आणि मुलगा मकरंद या चौघांची राहत्या घरी हत्या झाली होती. या घटनेने संपूर्ण नगर जिल्हा हादरला होता. सकाळी दूध घेण्यासाठी घरातल्या कुणीच दरवाजा उघडला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकावून बघितलं असता हरवणे कुटुंबांची हत्या झाल्याचे उघड झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)