त्या नगरसेवकाचा राजिनामा घेण्याचे नगर विकासचे आव्हान

सातारा -घंटागाडी चालकास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या त्या नगरसेवकाने पालिकेत जो गोंधळ घातला त्याला आळा घालण्याची वेळ आली आहे. आघाडीच्या नेत्यांनी त्याला घरी घालवण्याचे धारिष्टय दाखवावे, असे आवाहन नगर विकास आघाडीचे विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी केले आहे.

पत्रकात त्यांनी नमूद केले आहे, घडणाऱ्या अनेक घटना पहाता आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या निवडणुकीच्या काळजीपोटी याप्रकारांकडे डोळेझाक करावी लागत असावी किंवा नेत्यांनीच त्यांच्या नगरसेवकांना अशी कृत्ये करण्याची मुभा दिली असावी, अशा अनेक शंका आता सतावू लागल्या आहेत.अशा नगरसेवकांना पोसण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी पालिकेची सत्ता मिळवली आहे का? असा सवालही उपस्थित केला आहे. अशा मग्रुर आणि मुजोर नगरसेवकांना आवरा अन्यथा सातारकर तुम्हाला माफ करणार नाही. अशा नगरसेकवकांकडून असा कोणता फायदा होतोय, ज्यामुळे तुमचे नेते या दुष्कृत्यांकडे कानाडोळा करत आहेत, याचाही खुलासा सातारकरांपुढे विरोधकांनी करावा, असे ही मोने यांनी पत्रकात विचारले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)