‘त्या’ दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन

विद्यापीठ कार्यकारी अभियंता ऑईल फेकल्याचे प्रकरण


पुढील चौकशी सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्थावर विभागाचे कार्यकारी अभियंता आर. व्ही. पाटील यांच्यावर दोन कर्मचाऱ्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. तसेच, याबाबत पुढील चौकशी सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

स्थावर विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील यांच्यावर त्याच विभागातील दोन कर्मचाऱ्यांनी ऑईल टाकून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे विद्यापीठात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवित संबंधितांवर कारवाईची मागणी केली. तशा भावना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्याकडे व्यक्‍त केल्या होत्या. याबाबत विद्यापीठाने कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाने शुक्रवारी दोनही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

निलंबन कारवाईचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत
यासंदर्भात विद्यापीठाने आपला निर्णय शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केला. कार्यकारी अभियंता पाटील यांच्यावर गुरुवारी सकाळी दोन कर्मचाऱ्यांनी गैरवर्तणूक केली होती. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने प्रशासकीय कारवाईद्वारे त्या दोघांना गुरुवारी निलंबित केले आहे. याबाबत विद्यापीठामार्फत चौकशी सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. विद्यापीठाने निलंबनाची कारवाई केल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याचे स्वागत केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)