‘त्या’ तीन नगररचना योजना पालिकाच करणार

शहर सुधारणा समितीची मान्यता : रिंगरोडसाठी उभारला जाणार निधी

पुणे – पीएमआरडीएकडून शहराबाहेरून विकसित करण्यात येणाऱ्या 110 मीटरच्या रिंगरोडला निधी उभारण्यासाठी उरूळी देवाची आणि फुरसुंगी या गावांमध्ये तीन नगररचना योजना (टीपी स्कीम) प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. मात्र, ही दोन्ही गावे महापालिकेत आल्याने आता या तिन्ही योजना महापालिका करणार आहे. या योजनांचा इरादा जाहीर करण्यात महापालिकेच्या शहर सुधारणा समितीमध्ये गुरुवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उरुळी देवाची येथे 108 हेक्‍टरवर, तर फुरसुंगी येथे अनुक्रमे 263 हेक्‍टर आणि 302 हेक्‍टर क्षेत्रावर या प्रकारे एकूण तीन टीपी स्किम राबविण्यात येणार आहेत.

पीएमआरडीएच्या माध्यमातून विविध गावांमधून बाह्यवळण रस्त्यालगत (रिंगरोड) टीपी स्किम राबविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांपैकी मौजे फुरसुंगी येथे एक आणि उरुळी देवाची येथे दोन टीपी स्किम करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याला जमीन मालकांनी संमती दर्शविली आहे. त्या माध्यमातून या टीपी स्किमसाठी इरादा जाहीर केला जाणार आहे. या तीनही टीपी स्कीम राबविण्यासाठी पीएमआरडीए ने राज्य शासनाकडे विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मागितला होता. मात्र, महापालिकेने त्यास आक्षेप घेत, महापालिका हीच नियोजन प्राधिकरण असल्याने त्यास आक्षेप घेत राज्य शासनाला आपला अभिप्राय कळविला होता. शासनाकडून अद्याप त्याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. असे असतानाच प्रशासनाकडून शहर सुधारणा समिती पुढे हा टीपी स्कीमचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले. त्यानंतर समितीने त्यास मान्यता दिली असल्याचे समितीचे अध्यक्ष मेंगडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)