“त्या’ तिघांच्या टेहाळणीचा “संरक्षण’ने घेतला आढावा

दहशतवाद विरोधी पथकाने घेतले मोबाईल डिटेल्स

नगर: येथील एसीसी ऍण्ड स्कूल आर्मडच्या मुख्यालयाची तिघांनी केलेल्या टेहाळणीची दखल केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने घेतली आहे. स्थानिक पोलीस ठाण्याशी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधून तशी माहिती देखील घेतली आहे. दशतवाद विरोधी पथकाने या तिघांच्या मोबाईलचा डाटा ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, पारनेरच्या प्रदीप सीताराम शिंदे याच्याकडे सापडलेले एटीएम कार्ड हे चोरीचे असल्याचे समोर आले आहे. सोमनाथ भापकर यांचे हे एटीएम असून, त्यांनी भिंगार कॅम्प पोलिसांकडे जबाब नोंदविला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर-जामखेड रोडवरील एसीसी ऍण्ड स्कूल आर्मडच्या मुख्यालयाजवळ फिरणाऱ्या तिघांनी लष्करी जवानांनी ताब्यात घेत भिंगार कॅम्प पोलिसांकडे वर्ग केले होते. नायक सुभेदार भूपेंदर सिंग यांच्या फिर्यादीवरून प्रदीप शिंदे (रा. पारनेर), सोनू चौधरी व रिजवान अली (दोघे रा. मुझफ्फरनगर, उत्तरप्रदेश) या तिघांविरोधात लष्करी भागात अनाधिकाराने शिरल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना मंगळवारपर्यंत (ता. 8) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी या तिघांकडे चौकशी केली. यात या तिघांनी विसंगत अशी माहिती दिली.
सहायक निरीक्षक पाटील यांनी प्रदीप शिंदे याची दुपारी स्वतंत्र चौकशी केली.

दरम्यानच्या काळात पाटील यांनी शिंदेकडे सापडलेल्या एटीएम कार्डची माहिती घेतली. त्यावरून सोमनाथ भापकर यांना संपर्क साधला. ते श्रीरामपूरचे असल्याचे समोर आले. भापकर हे पोलीस ठाण्यात आल्यावर त्यांनी शिंदे याला ओळखला. दौंड ते नगर असा शिंदे आणि भापकर यांनी एकत्र प्रवास केला होता. त्यावेळी शिंदे याने भापकर यांना लष्करात असल्याचे सांगून 40 दिवसांच्या सुट्टीवर आल्याचे सांगितले होते. याच काळात भापकर यांचे एटीएम कार्ड गहाळ झाले होते. भापकर यांनी त्याची तक्रार देखील केली होती. हेच एटीएम कार्ड शिंदे याच्याकडे सापडली होती. भापकर यांनी ते ओळखली असून, तसा जबाब देखील पोलिसांनी नोंदविला आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने नगरच्या लष्करी मुख्यालयाजवळ अनाधिकाराने घुसून तिघांनी केलेल्या टेहाळणीची गंभीर दखल घेतली आहे. स्थानिक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप पाटील यांच्याशी संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी माहिती घेतली आहे. दरम्यान, दशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याशी संपर्क साधून या तिघांकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलचा डाटा घेतला आहे. जप्त केलेल्या मोबाईलमध्ये आयफोन आहेत. ते चिनी बनावटाची मोबाईल असल्याचे तपासात पुढे आले आहे. एटीएसने हा मोबाईल डाटा घेत त्यानुसार तपास देखील सुरू केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)