“त्या’ तरुणींना पोलीस कोठडी

पिंपरी – चिंचवड पोलीस ठाण्यात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या दोन तरुणींना मोरवाडी न्यायालयाने 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

स्मिता किशोर बाविस्कर (वय-22, रा. सेक्‍टर नंबर 22, ओटास्कीम, निगडी), प्रिया प्रदीप पाटील (वय-30, रा. अंजिनाथा हाऊसिंग सोसायटी, पाटील नगर, चिखली) आणि आकाश मिलिंद कोरे (वय-25, कोकणे कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) अशी त्यांची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांनी मद्य प्राशन केल्याचे निष्पन्न झाले. यावरून त्यांच्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, दारु पिऊन गाडी चालवणे व सरकारी कामात अडथळा करणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (दि. 30) मध्यरात्री गस्त घालत असताना वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन समोर स्मिता, प्रिया आणि आकाश हे तिघेजण संशयितरित्या थांबलेले आढळून आले. त्यांच्याजवळ नंबर नसलेली दुचाकी होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी तरुणींनी पोलिसांना अर्वाच्य भाषा वापरली आणि पोलिसांशी हुज्जत घातली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)