‘त्या’ ठेकेदारास पावणे दोन कोटींचा दंड

पिंपरी – चोविस तास पाणी पुरवठा या योजनेच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला महापालिकेने तब्बल पावणे दोन कोटीचा दंड आकारला असून त्याच्याकडूनच उर्वरीत काम करवून घेतले जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्या टप्प्यात 40 टक्के भागाचे काम 19 जून 2016 मध्ये सुरू झाले होते. जेएनएनयुआरएममधून हे काम होत असून सुमारे आठ लाख लोकसंख्येला फायदा होणार होता. यासाठी पहिल्या टप्प्याचे काम नागपूरच्या व्ही. आय. अय्यर या कंत्राटदाराला देण्यात आले होते. हे संपुर्ण कंत्राट हे सुमारे 207 कोटी रुपयांचे होते. मात्र 2018 साल उजाडले तरी हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे महापालिकेने नियमानुसार 1 कोटी 78 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्याने आत्तापर्यंत केवळ नियोजीत वेळेत 30 टक्केच काम पूर्ण केलेले आहे.

संबंधित ठेकेदाराला दंड आकारून काळ्या यादीत टाकणे अपेक्षीत होते. तरीही आयुक्तांनी नागपूर प्रेमापोटी त्याला दंड आकारला व त्याच्याकडूनच उर्वरीत काम करुन घेतले जाईल असे सांगितले. त्यामुळे हे काम नवीन ठेकेदाराला देण्याचे आयुक्तांनी टाळले आहे. पुढील काही महिने याच ठेकेदारावर नियंत्रण ठेवून त्यांच्याकडून हे काम पूर्ण करून घेणार असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या ठेकेदारापुढे महापालिका प्रशासन व आयुक्त झुकल्याचे समोर आले आहे. ठेकेदाराने वेळेत काम न केल्यामुळे महापालिकेला दिरंगाई व वाढीव खर्चाचा सामना करावा लागत असताना त्याच कामचुकार ठेकेदाराला पुन्हा काम दिल्याने काम पुढे तरी विहीत वेळेत पूर्ण होईल का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)