“त्या’ ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

पिंपरी – कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतना प्रमाणे वेतन दिले जात नसून त्यांची पिळवणूक करणाऱ्या ठेकेदारांना महापालिकेने काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आरोग्य विभागात नेमण्यात आलेल्या ठेकेदारांकडून कंत्राटी कामगारांना किमान वेतन दिले जात नाही. ठेकेदार कामगारांचे एटीएम, पासबुक, चेकबुक स्वत:कडे ठेऊन कामगारांना फक्त 6 ते 7 हजारच पगार देत असून बाकीचे पैसे स्वत:च्या खिशात घालत आहेत. या प्रकरणी काळेवाडी येथे एका महिलेने तक्रार दिली आहे.

इतर महिला तक्रार देण्यास गेल्या असता त्यांना धमकावण्यात आले असून काही महिलांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तीन महिन्यापासून या कष्टकरी कामगारांना पगार मिळाला नसून त्यांची उपासमार होत आहे. या कामगारांना किमान वेतन व प्रॉव्हिडंट फंड, ई.एस.आय या सुविधा निर्माण करुन द्याव्यात व संबंधीत ठेकेदारांकडून कामे काढून घेवून त्यांना काळ्या यादीत टाकावे. अन्यथा कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने तीव्र करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)