‘त्या’ ट्रोलरला शोएब अख्तरचे उत्तर

इस्लामाबाद : आपल्या मृत्यूची अफवा पसरवणाऱ्या एका फेसबुक युझरला पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने सडेतोड उत्तर दिले आहे. ही पोस्ट म्हणजे चेष्टा असल्याचे शोएबने सांगितले.

“वाईट बातमी, एका फळांच्या दुकानाजवळून जाताना शोएब अख्तरचं (रावळपिंडी एक्स्प्रेस) वयाच्या 42 व्या वर्षी निधन झालं,” अशी पोस्ट एहसान कमाल पाशा नावाच्या एका व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट केली होती.

याबाबत शोएबला समजल्यानंतर त्याने ट्वीट करुन उत्तर दिले. फळांच्या दुकानाजवळून मी रोज जातो. “थट्टा चांगली होती. चांगला प्रयत्न केलास मित्रा,” असे ट्वीट शोएब अख्तरने केले आहे. शोएब अख्तरने 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. शोएब सध्या पाकिस्तानच्या तरुण गोलंदाजांचा मेंटॉर बनला आहे. शिवाय तो सामाजिक कार्यही करतो. शोएब नुकताच सेंट मोरिट्ज आईस टी20 क्रिकेट टूर्नामेंटमध्ये सहभागी झाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)