“त्या’ जाहिरातदारांवर थेट फौजदारीच!

अतिरिक्‍त आयुक्तांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना

पुणे – शहरात स्वच्छ सर्वेक्षण मोहीम सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला जागा मिळेल तिथे जाहिराती चिटकवून शहराचे विद्रूपीकरण सुरू आहे. ही बाब दैनिक “प्रभात’ने समोर आणल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने या जाहिरातबाजांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर सध्या कारवाई केली जात असून त्याच मोहिमेअंतर्गत सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी ही कारवाई करण्याच्या सूचना महापालिकेच्या अतिरिक्‍त आयुक्‍त शितल उगले यांनी दिल्या आहेत, अशी माहिती आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे प्रमुख विजय दहिभाते यांनी “प्रभात’ला दिली.

शहरातील बसथांबे, रस्ता दुभाजक, दिशादर्शक फलक, पदपथ, सार्वजनिक भिंती, स्वच्छतागृहे, महावितरणचे फिडर पिलर अशा अनेक ठिकाणी लहान-मोठ्या व्यवसाय आणि क्‍लासेसचालकांनी ठिकठिकाणी जाहिराती लावल्या आहेत. त्यामुळे शहराचे बकालपण वाढले आहे. मात्र, अशा विद्रूपीकरण करणाऱ्यांना जाहिरातदारांना आळा घालण्याऐवजी महापालिका मात्र या जाहिराती काढण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहे. ही बाब दैनिक “प्रभात’ने “पुण्याचे बकालीकरण थांबवा हो..!’ या वृत्ताद्वारे समोर आणली होती. त्यानंतर प्रशासनास जाग आली आहे.

शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे. त्याचे अधिकार सर्व सहायक आयुक्तांना आहेत. त्यांना सूचना दिल्या आहेत. जाहिरातीवरील मजकुरावरून संबंधितांची माहिती घेऊन क्षेत्रीय आकाशचिन्ह निरीक्षक पोलिसांत तक्रार देणार आहेत. या जाहिराती काढण्यासाठी येणारा खर्चही दंड म्हणून वसूल करता येईल का, याची पाहणी करू.
– विजय दहिभाते, विभाग प्रमुख, आकाशचिन्ह आणि परवाना, मनपा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)