“त्या’ चिमुकल्याचा खूनच!

पिंपरी – थेरगाव येथे मोकळ्या मैदानात सापडलेल्या त्या चार वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले आहे.

थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयाजवळ एका 3 ते 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह शुक्रवार (दि. 7) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आढळल्याचा फोन वाकड पोलिसांना आला व एकच खळबळ उडाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता मृतदेह कुजलेल्या अवस्थेत अढळला. त्या मुलाच्या अंगावर हिरव्या निळसर रंगाचा टी-शर्ट व लाल रंगाची विजार होती. त्याचा एक पाय प्राण्याने कुरतडला होता, तर त्याचे दोन्ही होत हे मनगटापासून कापून टाकले होते.

-Ads-

मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर अहवालामध्ये मुलाच्या डोक्‍यात मारण्यात आले असून त्याचा खून हा तीन ते चार दिवसांपूर्वी त्याचा खून करुन त्याला पुरले होते. मात्र प्राण्यांनी किंवा कुत्र्यांनी त्याला वर काढले व हा प्रकार उघडकीस आला. हा खून अंधश्रद्धा किंवा भीक मागण्यासाठीच्या हेतूने झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान वाकड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत वर्णनाच्या मुलाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)