“त्या’ गॅस एजन्सीवर कारवाईची मागणी

चिखली – मोशी येथील गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याने दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे सिलिंडरचा स्फोट होवून एकजण जखमी झाला. या एजन्सी चालकावर कारवाई करण्याची मागणी छावा संघटनेच्या वतीने धनंजय जाधव यांनी केली आहे.

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छावा संघटना गेली चार वर्षांपासून अनधिकृत गॅस विक्री, रिफिलिंग करताना होणारे स्फोट, कर्मचारी व ग्राहकांबाबत बाळगली जाणारी निष्काळजी, अवाजवी शूल्क आकारणी, परवाना नसताना गॅस वितरण याविरोधात वारंवार आवाज उठवत आहे. मात्र, त्याकडे अन्न व पुरवठा विभागाने दुर्लक्ष केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चिखली येथे सिलिंडर रिफिलिंग करताना एका व्यक्तीचा बळी गेला. त्यानंतर मोशी येथे वैष्णवी गॅस एजन्सीमध्ये स्फोटाची घटना घडली. संबंधित एजन्सी सील करुन एजन्सी चालकावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)