त्या क्रांतीकारक उडीचा आज अमृतमहोत्सव

लाल सलाम करण्यासाठी मान्यवरांची हजेरी
सातारा- तो काळ होता, ब्रिटीशांच्या राजवटीच्या जुलमी सत्तेचा. भारत स्वतंत्र व्हावा म्हणून घरादारावर तुळशीपत्र ठेवत स्वातंत्र्य लढ्यात झपाटून काम करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना जेलमध्ये डांबून ठेवण्याचा ब्रिटीशांनी जणू सपाटा लावला होता. त्यातीलच एम म्हणजे क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी. आण्णांना साताऱ्याच्या तुरूंगात डांबण्यात आले होते. दरम्यानच्या काळात स्वांतत्र्य चळवळ बाहेर जोर धरू लागली होती. त्यामुळे कारागृहात अस्वस्थ झालेल्या आण्णांनी कारागृहाच्या तटावरून उडी मारत, स्व:ताला पुन्हा स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले होते. याच अग्नीकंडाच्या उडीला आज 75 वर्षे पुर्ण होत आहेत.

1942 साली क्रांतिवीर नागनाथ आण्णा सातारच्या जेलमध्ये होते.आण्णा म्हणजे एक तुफान होतं. या तुफानाला इंग्रजांनी डांबून ठेवलं होतं. आण्णांनाही आत अस्वस्थ होत होतं. बाहेर स्वातंत्र्याची चळवळ जोरात सुरू होती. सातारा जिल्ह्यातील गावच्या गाव इंग्रजी सत्तेच्या विरोधात पेटून उठली होती.त्याच्या बातम्या कानावर येत होत्या. त्या ऐकून आण्णांसारखा झुंजार माणूस आत अस्वस्थ होत होता.कधी एकदा तुरुंगाच्या बाहेर जातोय अस त्यांना झालेले . मग एक दिवस उजाडला. आण्णा त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने सातारच्या तुरुंगाच्या तटावर चढले आणि जीवाची पर्वा न करता तटावरून खाली उडी मारली.

तो दिवस होता 10 सप्टेंबर 1942 ,त्यानंतर ते साताऱ्यात सोमवार पेठेत रहाणाऱ्या कर्मवीर अण्णांच्या घरी आले.अण्णांच्या घरी मुक्काम केल्यानंतर ते गणी आत्तार यांच्यासोबत सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात रयतच्या शाळांतून मुक्काम करत चळवळ करत राहिले. लोकांना भेटत राहिले.सातारच्या प्रतिसरकारच्या एका थोर शिलेदारांन केलेल्या कामगिरीचा हा दिवस आहे. आज आण्णा नाहीत पण त्यांच्या अशा रोमहर्षक आठवणी आपल्यासोबत आहेत.त्या आपल्याला नक्कीच प्रेरणा देत असतात…!

1942च्या स्वातंत्र्यपूर्व काळात अगदी बालवयातच आपल्या कोवळ्या मुठीत क्रांतीचा अंगार आणि धगधगता निखारा घेऊन घरात पुन्हा पाऊल न ठेवण्याची शपथ घेऊन आण्णा घराबाहेर पडले. धुळ्याजवळ चिमठाण्याचा खजिना लुटण्यात त्यांचा सहभाग होता. साताऱ्यात नाना पाटलांच्या पत्री सरकारमध्ये त्यांचा सहभाग होता. आण्णांनी सागाव (कोल्हापूर) येथील पोलिस चौकीतून बंदुका पळविल्या व ती हत्यारे घेऊन त्यांनी सहकाऱ्यांसह वाळव्यातून फेरी काढली होती.

आण्णांच्या या लठ्यामुळे ते भारतभर अग्निकुंड म्हणूनही ओळखले जातात.आण्णांच्या कार्याला सलम म्हणून लोकांनी त्यांना दोन वेळा वाळवा मतदार संघातून विधानसेभेवर निवडून दिले. थोर स्वातंत्र्यसेनानी नागनाथअण्णांचा इतिहासात तर उल्लेख आहेच, पण सहकाराचा दीपस्तंभ आणि सामाजिक चळवळीचा धगधगता अग्निकुंड म्हणुन देशवासीयांच्या मनात त्यांचे अढळ स्थान आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)