“त्या’ कार अपघात प्रकरणातील आरोपीला अटक
——————
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 16- विना हॅण्ड लॉक उतारावर कार उभी केल्याने झालेल्या अपघातातील दोन लहान मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी कार चालकास बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अप्पर बस डेपो ते तैयब्बा मजीदलगतच्या रस्त्यावर विनावाहक फोर्ड गाडीने 70 मीटर परिसरातील 13 पादचारी व पथारीधारकांना उडवून एका टेम्पोला धडक दिली होती. याप्रकरणी गाडीचालक अजूबकुमार सिन्हा, (40, मूळ झारखंड, सध्या, रा. उंड्री- पिसोळी) याला अटक करण्यात आली आहे. तर अरमान नबीरसुल शेख (11) व आयान मेहबुब शेख (9) अशी गंभीर जखमींची नावे आहे. अप्पर बस डेपो समोरील जागेत फोर्ड ही गाडी उभी करून सिन्हा शेजारच्या दुकान खरेदीसाठी गेला होता. रस्त्यावर तीव्र उतार असल्याने व गाडीचा हॅन्डब्रेक लावला नसल्याने काही वेळात गाडी उताराने डॉल्फिन चौकाकडे गेली. या अपघात दोन लहान मुले तैयाबा मजीदमधून नमाज पडून आली होती. तीन पथारीधारक महिलांना धडकल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. इतर आठ पादचारी यात किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच तीन दुचाकी व एक टेम्पोचे नुकसान झाले आहे. पथारीधारक महिला उषा विश्वकर्मा, मीनाक्षी बिराजदार, लक्ष्मी बिराजदार याही गंभीर जखमी असून त्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता कक्षात उपचार घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)