त्या’ कर्मचाऱ्यांचे सेवानिलंबन रद्द

पिंपरी- महापालिकेच्या आरोग्य निरिक्षकालाच मारहाण करणाऱ्या आरोग्य विभागातील दोन कर्मचाऱ्यांवर सेवानिलंबनाची कारवाई महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रद्द केली आहे. आरोपी व फिर्यादी यांच्यात झालेल्या समेटामुळे सेवा निलंबनाऐवजी त्यांची प्रत्येकी एक वेतनवाढ स्थगित करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. सफाई कामगार विजेंद्र लालचंद आठवाल आणि सूरज दीपक बंडवाल अशी या दोन सफाई कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

महापालिका आरोग्य निरिक्षक उमेश शांताराम कांबळे हे कर्तव्य बजावत असताना, 6 जून 2017 रोजी या दोन्ही कामगारांनी त्यांना मारहाण केली होती. याप्रकरणी दोघांवर निगडी पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर या दोन्ही कामगारांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या दोन्ही कामगारांवर सेवा निलंबित करुन, खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी व फिर्यादी यांच्यात तडजोड झाल्याने, न्यायालयाने या दोन्ही सफाई कामगारांना दोषमुक्त केले आहे. मात्र, शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्यांनी याबाबत वरिष्ठ न्यायालयात अपिल दाखल केले आहे. तरीदेखील वरिष्ठ न्याय निर्णयाच्या अधिन राहून, पुन:स्थापित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन्ही कर्मचाऱ्यांचे सेवा निलंबन रद्द करण्यात आले असून, त्यांची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. तसेच त्यांना त्यांच्या मूळ पदावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)