“त्या’ ओव्हरथ्रोबद्दल बुमराहला धन्यवाद- कूक

लंडन: बुमराहने चेंडू अडवून परत फेकला. तो ओव्हरथ्रो होता असे समजून मी शतकाचा आनंद साजरा करायला सुरुवात केली होती. तो चेंडू जर पुजाराने अडवला असता तर माझी चांगलीच फजिती झाली असती. त्यामुळे त्या ओव्हरथ्रोसाठी मला बुमराहचे आभारच मानले पाहिजेत, असे उद्‌गार आपला अखेरचा कसोटी सामना खेळणाऱ्या ऍलिस्टर कूकने काढले आहेत.

या कसोटीत बुमराहने मला अनेकदा अडचणीत आणले होते. मात्र त्या ओव्हरथ्रोमुळे माझे काम सोपे झाले असे सांगून कूक पुढे म्हणाला की, अखेरच्या कसोटी सामन्यात तुम्ही अपेक्षित खेळी केल्याचा आनंद काही वेगळाच असतो. मी त्यावेळी 96 धावांवर होते आणि जडेजाच्या गोलंदाजीवर कव्हर्सच्या दिशेने फटका खेळला. तेथे क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या जसप्रीत बुमराहने चेंडू अडवून यष्टींच्या दिशेने जोरात फेकला आणि हा थ्रो अडविणे कोणत्याही भारतीय खेळाडूला जमले नाही. बुमराहच्या या ओव्हरथ्रोने मिळालेल्या आयत्या पाच धावांमुळे कूकने आपल्या अखेरच्या कसोटीत शतक पूर्ण केले.

कूक म्हणाला की, 96 धावांवर फलंदाजी करत असताना जडेजाला गोलंदाजीस आलेले पाहिल्याने मी थोडासा दबावाखाली आलो होतो. त्यावेळी मी स्वतःला समजावले, की थोडा वेळ जाऊ दे, हे षटक खेळून काढ… आणि त्याच दरम्यान बुमराहने तो ओव्हरथ्रो केला आणि त्या ओव्हरथ्रोने मला दडपणातून बाहेर काढले. त्यामुळे या शतकासाठी मी नेहमीच जसप्रीत बुमराहचा आभारी राहणार आहे.

आपल्या अखेरच्या सामन्यात ऍलिस्टर कीकने शतकी खेळी तर केलीच, शिवाय रूटच्या साथीत त्याने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने सामन्यावर आपला वर्चस्व कायम राखले. दरम्यान, कूकने पदार्पणात आणि शेवटच्या सामन्यात केलेली दोन्ही शतके भारताविरुद्ध आहेत. कूकने 2006 मध्ये भारताविरुद्धच्या नागपूर कसोटीत पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने नाबाद 104 धावांची खेळी केली होती.

कूकचे अखेरच्या सामन्यातील शतक हे कसोटी कारकीर्दीतील त्याचे 33वे शतक होते. 76 धावांचा टप्पा ओलांडताच त्याने सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्यांच्या यादीत श्रीलंकेचा माजी कसोटीपटू कुमार संगकाराला मागे टाकत पाचवे स्थान पटकावले. संगकाराने 134 कसोटी सामन्यांत 291 डावांमध्ये 12 हजार 400 धावा केल्या असून कूकने आजच्या शतकी खेळीबरोबच 12 हजार 472 धावांचा टप्पा गाठून आपल्या कारकीर्दीला पूर्णविराम दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)