‘त्या’ आरोपी महिलेने घेतला पोलिसाच्या हाताला चावा

पालघर – आरोपी महिलेने कोर्टातून पोलीस गाडीत बसवत असताना एका महिला पोलिसाच्या हाताला कडकडून चावा घेतला. आरोपी महिलेला विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंकी संतोष शेगर उर्फ शिल्पा सुनील माळी असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिला रानळे तलाव परिसरातून नागरिकांनी पकडून विरार पोलिसांच्या हवाली केले होते. ती लॉकप गार्ड म्हणून असलेल्या अर्चना चंद्रकांत शिंदे यांच्या ताब्यात होती. न्यायालयात हजर करून आल्यावर तिला रिमांड कस्टडी मिळाली होती.

विरार पोलीस ठाण्यात नेत असताना ती गाडीत चढायला तयार नव्हती. महिला पोलिसांसोबत पुरुष पोलीस होते. तेव्हा शिल्पा हिने कपडे काढण्याची धमकी दिली आणि पोलीस गाडीत ढकलताना तिने लेडी पोलिसाच्या हाताला कडकडून चावा घेतला. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक निलेश गायकवाड करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)