पुणे – सतरा वर्षीय मुलीस संबंध ठेवण्यासाठी मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी आरोपीचा जामीन फेटाळला आहे. सनी उर्फ सुहास जगन्नाथ मोरे (रा. न्हावरा, ता. शिरुर) असे आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी पीडितेच्या वडीलांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनयमांतर्गत (पॉस्को) गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 28 एप्रिल 2018 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली होती. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन तिचा हात पकडत संबंध ठेवण्याबाबत धमकाविले होते. मुलीने नकार दिल्यानंतर तिला मारहाण करून तो पळून गेला होता. आरोपी पीडितेचा पाठलाग करताना पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार समोर आले आहेत. पीडिता अल्पवयीन असून, तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपीला अटकपूर्व जामीन मिळाल्यास तो पंच आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्‍यता असल्याचा युक्‍तीवाद सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)