“त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाईचा दणका

 

पिंपरी- शहरातील विस्कळीत पाणीपुरवठाप्रकरणी दोषी असलेल्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश उपमाहापौर सचिन चिंचवडे यांनी दिले. महापौर राहूल जाधव यांच्या अनुपस्थितीत मंगळवारी (दि.20) झालेल्या सर्वसाधारण सभेचे पीठासन अधिकारी म्हणून उपमहापौर चिंचवडे यांन कामकाल पाहिले. सभा तहकुब झाल्यानंतर, चिंचवडेंच्या आदेशानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली. या आदेशाचे नेमके प्रयोजन काय? असा प्रश्‍न अधिकाऱ्यांना पडला आहे.

परदेश दौऱ्यावर गेलेले महापौर राहूल जाधव अद्यापही शहरात दाखल झालेले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी आज झालेल्या सर्वसाधारण सभेचे पीठासन अधिकारीपदाचे कामकाज सांभाळले. सभेला सुरुवात होताच नामदेव ढाके यांनी विशाल कांबळे यांच्या सत्काराचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर सर्व गटनेत्यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ पार पडला. त्यानंतर विलास मडीगेरी यांनी मान्यवरांच्या मृत्युचा संदर्भ देत शोकप्रस्ताव मांडला. केंद्रीय मंत्री अनंत कुमार कॉ. माधवराव गायकवाड, मेजर चांदपुरी यांच्यासह अन्य मृत व्यक्‍तिंना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभा येत्या 20 डिसेंबरपर्यंत दुपारी एक वाजेपर्यंत तहकुब करण्यात आली.
त्यानंतर शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचा संदर्भ देत, या विस्कळीत पाणीपुरवठा प्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश उपमहापौर सचिन चिंचवडे यांन द्दिले. हा आदेश देण्याचे नेमके प्रयोजन काय? असा प्रश्‍न सर्वच अधिकाऱ्यांना पडला आहे.

शहराला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी 30 ते 35 टक्के पाण्याची गळती होती. पाणीगळती होत असलेल्या ठिकाणांची माहिती देऊनही पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून त्यावर उपाययोजना केली जात नसल्याने, गळतीचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होत असतो. त्यामुळेच अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आज दिले आहेत.
-सचिन चिंचवडे, उपमहापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)