‘त्या’ अधिकाऱ्यांचे वेतन रोखले

मालमत्तेची माहिती न दिल्याने आयुक्तांचे आदेश

पुणे – मालमत्तेची वार्षिक माहिती न देणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. सादर करण्यासाठी वारंवार मुदत देऊनही माहिती दिली जात नसल्याने कारवाईचे आदेश सामान्य प्रशासन विभागास दिले असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून देण्यात आली.

-Ads-

महापालिकेत कार्यरत असलेल्या प्रथमवर्ग (1) आणि द्वितीय श्रेणीतील (वर्ग2)च्या अधिकाऱ्यांना प्रत्येक आर्थिक वर्षातील आपल्या मालमत्तेचे विवरणपत्र आयुक्तांना गोपनीयरित्या सादर करणे बंधनकारक आहे. महापालिकेत वर्ग 1 आणि 2 चे सुमारे 116 अधिकारी आहेत. या अधिकाऱ्यांनी आपल्या 2017-18 या आर्थिक वर्षाच्या मालमत्तेची माहिती आर्थिक वर्ष संपल्यानंतर तातडीने सादर करणे आवश्‍यक आहे. मात्र, कागदपत्रांची पूर्तता तसेच इतर काही कारणास्तव अधिकारी पुढे दोन महिने ही माहिती सादर करत नाहीत.

त्यामुळे महापालिका प्रशासनाने या अधिकाऱ्यांना माहिती सादर करण्यासाठी 30 जूनची मुदत दिली होती. त्यानंतरही या मुदतीत वाढ करून 15 जुलै 2018 पर्यंत करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही 52 अधिकाऱ्यांनी माहितीच सादर केलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दोन दिवसांपूर्वी दिले आहेत.

काही तासांतच आदेश गायब
आयुक्तांनी हे आदेश दिल्यानंतर शुक्रवारी ते महापालिकेच्या संकेस्थळावर अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणाऱ्या कार्यालयीन परिपत्रकाच्या विभागात दर्शविले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांमध्ये याचीच चर्चा रंगली होती. ही माहिती बाहेर जाण्याच्या शक्‍यतेने संध्याकाळी हे आयुक्तांचे आदेश तातडीने संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून देण्यात आली. मात्र, ते का काढण्यात आले, कोणाच्या सूचनेनुसार काढण्यात आले, याची माहिती देण्यास नकार देण्यात आला.

नावांची माहिती देण्यास नकार
प्रशासकीय सुत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार काही उपायुक्त तसेच सह महापालिका आयुक्तांचाही माहिती न देणाऱ्यांमध्ये समावेश आहे. त्यांना वारंवार कळवूनही माहिती दिली जात नसल्याने ही कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या अधिकाऱ्यांची नावे देण्यास प्रशासनाकडून नकार देण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)