‘त्या’ अतिरिक्त आयुक्तांची बदली

उस्मानाबाद जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती ? 

सुनील राऊत 
पुणे : राज्यशासनाने महापालिकेचे तिसरे अतिरिक्त आयुक्तपद भरून अवघा महिनाही झालेला नसताना, महापालिकेतील एका अतिरिक्त आयुक्ताची बदली उस्मानाबाद जिल्हाधिकारीपदी करण्यात आली असल्याची खात्रीशिर माहीती प्रशासकीय सुत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात ही बदली चर्चेचा विषय बनली आहे. सध्या महापालिकेत अतिरिक्‍त आयुक्तपदी शितल उगले, राजेंद्र निंबाळकर आणि महिन्याभरापूर्वी डॉ. वीपीन शर्मा यांची राज्यशासनाने नियुक्ती केलेली आहे.

असे असतानाच; एका अतिरिक्त आयुक्तांची बदली निश्‍चित झाली असून त्यांना उस्मानाबाद जिल्हाधिकारीपदी नियुक्ती दिली जाणार आहे. तर उस्मानाबादचे विद्यमान जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नाशिकच्या आयुक्तपदी करण्यात येणार होती. मात्र, त्या जागी शासनाकडून अश्‍विीनी जोशी यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गमे बदलीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यातच लोकसभा निवडणूकांच्या कालावधीत कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करायच्या असल्यास त्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता घ्यावी लागते. त्यामुळे ही बदली थांबली असून पुढील काही दिवसात त्याबाबतचे आदेश निघणे शक्‍य असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

महापालिकेत राज्यशासनाकडून पहिल्यांदाच तीन अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यात महापालिकेच्या सेवा नियमवलीत मंजूर असलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्याला बढतीने देण्याच्या अतिरिक्त आयुक्त पदावर डॉ. विपीन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरून पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून ही नियुक्ती रद्द करण्याची मागणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी राज्याच्या नगरविकास विभागाकडे केली आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेत सत्ताधारी भाजप पदाधिकारी आणि अतिरिक्‍त आयुक्त शितल उगले यांच्यात शितयुध्द सुरू असून भाजप पदाधिकाऱ्यांनी उगले यांच्या बदलीसाठी थेट सह्यांची मोहीम राबवित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. तर तिसरे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर अवघ्या सहा महिन्यांपूर्वी महापालिकेत बदली होऊन आले असून, उगले यांच्यावरील पदाधिकाऱ्यांच्या नाराजी नाटयानंतर महापालिकेची काही प्रमुख खाती निंबाळकर यांच्याकडे देत आयुक्तांनी या वादावर पडला टाकला आहे.

 

सोशल मिडीयावर मेसेज
दरम्यान, महापालिकेतील या अतिरिक्त आयुक्तांच्या बदलीचे मेसेज उस्मानाबाद जिल्हाल्यात फोटोसह फिरत आहे. त्याबाबत त्या भागातील काही पत्रकारांशी संपर्क साधला असता, त्यांनीही या वृत्तास दुजोरा दिला. तसेच विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांना अद्याप नियुक्ती देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
25 :thumbsup:
15 :heart:
41 :joy:
10 :heart_eyes:
10 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)