…त्यावेळीच मला कैलास मानसरोवरची यात्रा करावी वाटली -राहुल गांधी

नवी दिल्ली : राहुल गांधी यांचा नुकताच विमान अपघात होता होता राहिला होता. त्यावेळच्या अनुभवाविषयी त्यांनी माहिती दिली. ‘मी जेव्हा विमानाने कर्नाटकला चाललो होतो त्यावेळी माझं विमान अचानक 8000 फूट खाली आलं. तेव्हा वाटले की, आमची गाडी जणू काही थांबलीच… ज्यावेळी मी सुखरुप असल्याची मला जाणीव झाली त्यावेळी मला असे वाटले की, मी कैलास मानसरोवरची यात्रा करावी.’ असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर कार्यकर्त्यांच्या काळजालाच हात घातला.

राहुल गांधी यांनी आपली मंदिर डिप्लोमसी सुरुच ठेवली आहे. कारण की, यंदा होणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेला जाणार असल्याचे राहुल गांधींनी जाहीर केले आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर जनआक्रोश रॅलीमध्ये राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कर्नाटक निवडणुकीनंतर मानसरोवर यात्रेसाठी 15 दिवसांची सुट्टी मागितली आहे.

राहुल गांधी यांच्या मते, कैलास मानसरोवरच्या यात्रेचा विचार कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आला. रामलीला मैदानावरील जनआक्रोश रॅलीवेळी भाषण संपवल्यानंतर राहुल गांधी पुन्हा माईकजवळ आले आणि त्यांनी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली. ‘मला कळत नाही की, मी  ही गोष्ट तुम्हाला सांगू की नको. ‘मी जेव्हा विमानाने कर्नाटकला चाललो होतो त्यावेळी माझं विमान अचानक 8000 फूट खाली आलं. तेव्हा वाटलं की, आमची गाडी जणू काही थांबलीच… ज्यावेळी मी सुखरुप असल्याची मला जाणीव झाली त्यावेळी मला असं वाटलं की, मी कैलास मानसरोवरची यात्रा करावी.’ असं म्हणत राहुल गांधींनी कार्यकर्त्यांकडे 15 दिवसांची सुट्टी मागितली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)