….त्यामुळे देशातील अर्थव्यवस्था डबघाईला गेली

मुंबई: देशात सध्या बँकांमधीलसुरु असणाऱ्या अडचणी आणि त्यावर तोडगा काढण्यात सरकारकडून होणारा विलंब यामुळे आता देशातील तज्ज्ञांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. नोटाबंदी आणि त्यानंतर निर्माण झालेल्या चलनटंचाईमुळे बँकांसह अर्थव्यवस्थाही डबघाईला आली आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

देशातील काही प्रमुख संघटना-संस्था आणि आर्थिक आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मुव्हमेंटने (एनएपीएम) प्रसिद्ध केले आहे. त्यात सर्व समस्या मांडण्यात आल्या आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून अनेक राज्यांतील एटीएममध्ये पैसे नाहीत. त्यामुळे ८ नोव्हेंबर २०१६ नंतर पुन्हा देशात चलनसंकट निर्माण झाले आहे, असे एनएपीएमने पत्रकात नमूद केले आहे. नोटाबंदीनंतर केवळ १८ महिन्यांतच पुन्हा निर्माण झालेल्या चलनटंचाईमागील अनेक कारणे सांगितली आहेत. दुसरीकडे रिझर्व्ह बँकेने पुरेशी रोकड असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, बाजारात पुरेशी रोकड नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या चलनटंचाईचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय आणि लहान व्यापाऱ्यांना बसला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)