त्यामुळे तत्सम सोशल मीडियाचा वापर मी करत नाही – रघुराम राजन

कोची: अनेक कंपन्या आणि प्रसिद्ध व्यक्ती महत्त्वाच्या घोषणांसाठी ट्विटरचे व्यासपीठ वापरतात. मात्र, काही मोजक्या व्यक्ती याला अपवाद आहेत, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हेदेखील त्यांच्यापैकी एक. सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत आर्थिक धोरणांचे विश्लेषण करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर अकाऊंटसच्या फॉलोअर्सच्या संख्येत मोठी भर पडली होती. मात्र, असे असूनही स्वत: रघुराम राजन यांचे ट्विटर अंकाऊट नसल्याबद्दल अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते. नुकत्याच कोचीत झालेल्या एका कार्यक्रमात रघुराम राजन यामागील कारण स्पष्ट केले.

माझ्याकडे या सगळ्यासाठी फारसा वेळ नसतो. एकदा का तुम्ही ट्विटर वा तत्सम सोशल मीडियाचा वापर करायचे ठरवले, तर तुम्हाला त्याठिकाणी सातत्याने वेळ द्यावा लागतो. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे ट्विटरवर पटकन व्यक्त होण्यासाठी जे कौशल्य लागते, ते माझ्याकडे नाही. मी अवघ्या 20 ते 30 सेकंदांमध्ये 140 शब्द लिहू शकत नाही, असे राजन यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाकडून त्यांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली होती. परंतु, राजन स्वत:हूनच ही ऑफर नाकारल्याचे स्पष्ट केले होते. मी जेव्हा आरबीआयमध्ये होतो, त्यावेळी लोकांना वाटायचं की मी आयएमएफमध्ये परत जावं. माझ्याजवळ एक चांगला मेंदू आहे, जो दिवसातील अनेक तास काम करतो. ही एक नोकरी आहे आणि ती मला आवडते. राजकारणात येण्याला माझा नकार आहे. राजकारणात जाण्यास पत्नीने स्पष्ट शब्दांत विरोध दर्शवल्याचेही राजन यांनी सांगितले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)