…त्यामुळेच मला दिलेलं निमंत्रण रद्द करण्यात आलं- नयनतारा सहगल

मुंबई: 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन करण्यासाठी आयोजकांनी ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेले निमंत्रण अचानक रद्द केले आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे हे निमंत्रण रद्द करण्यात आल्याचे पत्र आयोजकांनी त्यांना पाठविले आहे. यामुळे साहित्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, त्यांच्या भाषणाने वाद निर्माण होण्याच्या भीतीपोटी हे पाऊल संमेलन आयोजकांनी उचलल्याची चर्चा आहे.

दरम्यान, नयनतारा सहगल यांनी यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “साहित्य संमेलनातील भाषणात मी सद्यस्थितीवर बोलणार होते. असहिष्णुता, हिंसाचाराच्या वातावरणावर भाष्य करणार होते. त्यामुळेच मला दिलेलं मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं निमंत्रण आयोजकांकडून रद्द करण्यात आलं असावं, गोवंश, गोमांसावरुन होणाऱ्या हत्या, द्वेषाचं राजकारण, लेखकांचे-विचारवंतांचे खून याबद्दल प्रत्येक नागरिकाला लाज वाटायला हवी” असं त्यांनी म्हटले आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)