“त्याच्या’ स्वप्नांवर काळाचा घाला

पिंपरी – अमेरिकेतील हॉटेलमध्ये नोकरी मिळाल्याने त्याचे विदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पुर्ण होणार होते. नेहमीप्रमाणे घरच्यांना “सरप्राईज’ देण्यासाठी तो कुणालाही काहीही न कळविता मुरूडवरुन येत होता. मात्र, काळाने त्याच्या स्वप्नांवर घाला घातला. पिंपरीतील अपघातात जागीच ठार झालेल्या अमोल बोरगावकर याच्या मृत्यूने रावेत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रावेत येथे राहणारा अमोल बोरगावकर या 28 वर्षीय तरुणाने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पुर्ण केले. मुरुड येथील एका नामांकीत हॉटेलमध्ये नोकरी देखील मिळाली. दिवाळीच्या सुट्टया उशीरा मिळाल्याने अमोल 23 नोव्हेंबरला मुरुड येथून पुण्याकडे दुचाकीवरुन निघाला होता. सुट्ट्या आनंदात घालविण्याचा त्याचा मानस होता. मात्र, काळाने त्याच्या आनंदावर घाला घातला. पिंपरी येथील मोरवाडी चौकात अज्ञात वाहनाने मध्यरात्री 3 च्या सुमारास त्याच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यात त्याच्या डोक्‍याला गंभीर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.

-Ads-

आपल्या गुणवत्तेच्या जोरावर अमोलला अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एका हॉटेलात 5 लाख रुपये महिना वेतनावर नोकरी सुद्धा मिळाली होती. जून महिन्यात अमेरिकेला जाणार असल्याने तो आनंदी होता. मात्र, क्षणात त्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला. त्याला दीड वर्षाचा एक मुलगा आहे. अमोल केव्हाही घरी निघत असताना अचानक घरी यायचा आणि सरप्राईज द्यायचा. मात्र, यावेळी तो ते देवू शकला नाही. थेट त्याचा मृतदेह घरी आल्याने त्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)