“त्याच्या’साठी अग्निशमन दल ठरले “देवदूत’!

पिंपरी – अग्निशमन दल हे कायम नागरिकांसाठी देवदुतासारखेच धावून येतात. मात्र केवळ आगीच्या घटनांमध्येच नाही तर चक्क एका अपघाताच्यावेळीही अग्निशमन दलाच्या “देवदूत’ या वाहनाने 12 वर्षीय मुलाचे प्राण वाचवले. शनिवारी (दि. 1) वाल्हेकरवाडी बास्केट ब्रीजवर सकाळी पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबतची हकीकत अशी की, अभिजीत दत्ता जाधव हा 12 वर्षाचा मुलगा वाल्हेकरवाडी येथे शाळेत पायी जात असताना त्याने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी निगडी-प्राधिकरणाच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू टेम्पोची (एमएच 14, सीपी 2461) अभिजीतला जोरात धडक बसली. यावेळी अग्निशमन दलाचे देवदूत हे वाहन निगडी प्राधिकरण केंद्राकडे जात होते. समोर घडलेला अपघात व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जवानांनी गाडी थांबवली. जवांनानी रुग्णवाहिकेला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. मुलाची स्थिती नाजूक झाल्याने जवानांनी थेट आपल्या गाडीतूनच रुग्णालय गाठले. दुसऱ्या एका जवानाने मुलाच्या घरचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाच्या जवळ घरची ओळख पटेल असे काहीच नव्हते. अखेर त्याच्या गणवेशावरुन वाल्हेकरवाडी येथील महापालिकेची शाळा गाठली.

शाळेतून घरचा पत्ता मिळाल्यानंतर घर शोधले मात्र त्याची आई मजूर असून ती ताथवडे येथे कामावर गेली होती. जवानाने आईला कामावरुन थेट रुग्णालयात आणले. दरम्यान, हा अपघात असल्याने मुलाला प्राधिकरण येथील एका खासगी रुग्णालयाने दाखल करुन घेण्यास नकार दिला. तेथून त्या मुलाला आणखी एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. देहभान विसरुन जवानांची ही धावपळ सुरु होती. संबंधीत टेम्पो चालकानेही मुलाच्या उपचाराचा खर्च करण्याची तयारी दाखवली.

फायरमन सूरज गवळी, वाहन चालक विशाल लाडके, फायरमन प्रतीक जराड हे रहाटणी केंद्रावरुन गणेशोत्सव काळात लागणारे बचाव कार्याचे साहित्य प्राधिकरण येथील अग्निशाम केंद्राला देण्यासाठी जात होते. यावेळी ही घटना घडली. मात्र त्यांनी दाखवलेली माणुसकी व प्रसंगावधान यामुळे एका चिमुकल्याचे प्राण वाचले. मुलाची प्रकृती स्थिर असून मुलाच्या अग्निशमन दलाच्या जवानांमुळे माझ्या मुलाचे प्राण वाचले, अशी प्रतिक्रिया दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)