‘त्यांना’ मला ठार मारायचंय : केजरीवाल 

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर काल झालेल्या ‘मिर्ची पावडर’ हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज अरविंद केजरीवाल यांनी आपले मत मांडताना ‘काही शक्तिशाली माणसं आपणाला जीवे मारण्याच्या प्रयत्नात आहेत’ असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

यावेळी बोलताना त्यांनी “माझ्यावर गेल्या २ वर्षांमध्ये चार वेळा हल्ला झाला असून ही बाब हलक्यात घेण्यासारखी नाहीये. हे हल्ले पूर्वनियोजित प्रकारचे असून कोणीतरी हल्लेखोरांना असे हल्ले करण्याच्या सूचना देत आहे. आम्ही त्यांच्या साठी अडथळा बनलो असल्यानेच असे हल्ले केले जात आहेत.” असे वक्तव्य केले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याच्या काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी असे हल्ले करण्यामागे भाजपाचे नेते असल्याचा आरोप केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)