काश्मीर: कठूआ बलात्कार प्रकरणातील पिडीतेच्या वडिलांनी आपल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना काही सवालकरत आपल्या भावनांना वाट करून दिली आहे.  ‘कोण हिंदू कोण मुसलमान हे त्या छोटय़ा मुलीला कसे माहिती असणार?.. त्यांना बदला घ्यायचाच होता तर, निष्पाप चिमकुलीवर का अत्याचार केले?.. तिला हात कुठला पाया कुठला हे देखील तिला समजत नव्हते.. डावा हात कुठला आणि उजवा कुठला हेही तिला ठाऊक नव्हते’, अशा शब्दांत मृत मुलीच्या वडिलांनी आपले मन मोकळे केले आहे.

वडिलांना तिला खासगी शिक्षण संस्थेत भरती करायचे होते. ‘ती डॉक्टर किंवा शिक्षक होईल अशी मोठी स्वप्ने आम्ही बघितली नव्हती. इतकेच वाटले होते की, थोडे शिकली तर स्वत: पायावर उभी राहील, स्वतचे आयुष्य काढेल.. ’, तिच्या वडिलांनी भावनांना वाट करून दिली.

‘बलात्कार प्रकरणातील आरोपींनी लोकांना आमच्या विरोधात फितवले. या लोकांनी आरोप केला की आम्ही जम्मूमधून गायींची तस्करी करतो आणि काश्मीरमध्ये विकतो. अमली पदार्थाचीही विक्री करतो.. आमची वस्ती हिंदूसाठी त्रासदायक ठरते आहे. पण, यातील कुठलेही आरोप खरे नाहीत’, वडिलांनी स्पष्ट केले. माजी महसूल अधिकारी सांजी राम यांच्यामुळे समाजात भेदाभेद सुरू झाल्याचा आरोप वडिलांनी केला. ‘सांजी गावात येऊन राहिले आणि आमच्या लोकांना धमक्या दिल्या. गावातून जायलाही त्यांनी विरोध केला. चरायला नेलेल्या मेढय़ाही त्यांनी हिस्कावल्या’, असे वडिलांचे म्हणणे आहे. नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणीच त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)