“त्यांना’ कोणी अडथळे निर्माण करू शकत नाही -कासवा

राजगुरूनगर- सामाजिक जाणिवेचे भान असणाऱ्या स्वयंप्रकाशी व्यतिमत्वाला कोणतेही राजकारण, प्रवृत्ती अथवा पक्षकारण अडथळे निर्माण करु शकत नाही, असे प्रतिपादन राजगुरुनगरचे माजी सरपंच प्रदीप कासवा यांनी केले. खेड तालुका विद्यार्थी-पालक संघाच्या वतीने आयोजीत वार्षिक सर्वसाधारण सभेत कासवा बोलत होते. खेड तालुका एज्यूकेशन सोसायटीच्या संचालकपदावर कासवा यांची फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा या सभेत सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी-पालक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर, पर्याय प्रतिष्ठानचे वामन बाजारे, रेखा कासवा, रामचंद्र सोनवणे, अर्चना दडमल, संदेश नवले, दत्ता सांडभोर आदी उपस्थित होते. आदी उपस्थित होते. प्रदीप कासवा म्हणाले, मोठमोठ्या भांडवलदारांपासून अगदी सामान्य कष्टकऱ्यांसोबत स्नेहाचे संबंध कायम आहेत; परंतू तरीही सर्वसामान्य माणूस हाच माझ्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. त्याच सदिच्छांमुळे गावचा सरपंच, आर्थिक संस्थास्‌, सेवाभावी संस्था आणि शिक्षणक्षेत्रात चांगले काम करु शकलो. यापुढे त्याला अधिक गती देणार असल्याचे त्यांनी सांगितेले. यावेळी ऍड. साधना बाजारे, किरण खुडे, वामन बाजारे यांची भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन अनिल लांडगे तर पल्लवी नाईक यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)