“त्यांच्या’ स्मृतीतून शहरात राष्ट्रीय खेळाडू घडतील!

पिंपरी – राष्ट्रीय खेळाडू कै. पै. मारुती (नाना) सहादू कंद यांनी कबड्‌डी या खेळात पिंपरी-चिंचवड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले आहे. मैदानांच्या नामकरणाच्या माध्यमातून दिवंगत खेळाडूंच्या स्मृती जतन करण्याच्या प्रयत्नामुळे जास्तीत-जास्त राष्ट्रीय खेळाडू या शहरातून निर्माण होतील, असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 8 इंद्रायणीनगरमध्ये नव्याने विकसित केलेल्या स्केटिंग रिंक ग्राउंडचे राष्ट्रीय खेळाडू कै.पै.मारुती (नाना) सहादू कंद असे नामकरण व त्याचे उद्‌घाटन आमदार लांडगे यांच्या हस्ते रविवारी (दि. 25) झाले. त्यावेळी ते बोलत होते.

महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास क प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, ई प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे, माजी महापौर नितीन काळजे, नगरसदस्य नितीन लांडगे, राजेंद्र लांडगे, रवि लांडगे, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, स्विकृत सदस्य विजय लांडे, गोपीचंद धावडे, माजी नगरसेवक दत्ता लांडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता आंबादास चव्हाण, कार्यकारी अभियंता संजय घुबे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक आकाश कंद यांनी केले तर सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले. आभार क प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे यांनी मानले.

सव्वा दोन कोटींचा खर्च
राष्ट्रीय खेळाडू कै.पै.मारुती (नाना) सहादू कंद स्केटिंग रिंक ग्राउंड हे 2.47 एकर जागेत तयार केले आहे. पिंपरी-चिंचवड मधील एकमेव रिंक आहे. 200 मीटर परिघाचे स्केटिंग रिंक नवोदित खेळाडूंसाठी, 100 मीटर सराव रिंक, त्यासाठीचे कोटींग परिसराला सिमा भिंत, वाहनतळ स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आदी सोयी-सुविधांसह याठिकाणी उपलब्ध आहेत. सुमारे सव्वा दोन कोटींचा खर्च यासाठी करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)