‘त्यांच्या’ प्रत्येक गोळीला बॉम्बने उत्तर दिले पाहिजे-पाकच्या कुरापतीवर अमित शहांचा तोडगा

नवी दिल्ली : मागील काही दिवसात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी सरकार वेळोवेळी प्रयत्न करताना दिसते. मात्र आता पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि वाढत्या कारवाया लक्षात घेता आता त्यांच्या प्रत्येक गोळीला बॉम्बने उत्तर दिले पाहिजे हाच एक पर्याय आता उरला असल्याचे मत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नोंदवले आहे.

पाकिस्तानला भारतीय सैन्यही जशास तसे उत्तर दिले जाते आहे तरीही कारवाया थांबण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यासंबंधीचा प्रश्न विचारले असता त्याला उत्तर देताना आता त्यांच्या प्रत्येक गोळीला बॉम्बने उत्तर देणे हाच पर्याय आहे असे शहा यांनी म्हटले आहे. सर्जिकल स्ट्राइक केला तरीही त्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. भारताविरोधात पाकिस्तानच्या कारवाया थांबताना दिसत नाहीत. पाकिस्तान अजूनही भारतात दहशतवादी पाठवत आहे. त्यांच्या गोळ्यांमुळे निष्पाप लोकही मारले जात आहेत. हे आता कदापी सहन केले जाणार नाही असेही शहा यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)