त्यांच्यापेक्षा आम्ही सरस खेळलो- विराट कोहली

सिडनी: मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटणे हे दोन्ही संघानी केलेल्या कडव्या खेळाचे नितळ प्रतिबिंब आहे, असे प्रतिपादन भारतीय कर्णधार विराट कोहलीने केले आहे. तिसऱ्या सामन्यानंतर झालेल्या समारोह सोहळ्यात त्याने हे मत मांडले आहे. तीन टी- 20 सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता तर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताने 6 गडी राखून विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली होती.

यावेळी पुढे बोलताना विराट म्हणाला, फलंदाजीला पोषक असणाऱ्या मैदानावर 68 धावात एक बळी गमाविणाऱ्या संघाला 164 धावत रोखून आमच्या गोलंदाजांनी कमाल केली . आजच्या सामन्यात आम्ही खूपच व्यावसायीक खेळ केला. त्यात आमचे गोलंदाज आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपेक्षा सर्वच बबींमद्ये सरस ठरले. भारतीय सलामीवीरांविषयी बोलताना विराट म्हणाल, जेव्हा आमचे सलामीवीर भरात असतात तेव्हा त्यांना रोखणे कोणत्याही संघासाठी कठीण काम असते. त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली की सामना जिंकणे सोपे होते.

तसे बोलायला गेले तर, तांत्रिकदृष्ट्‌या आणि खेळाच्या शैलीचा विचार केला तर आम्ही या मालिकेत ऑस्ट्रेलियापेक्षा सरस होतो. आजच्या सामन्यात गोलंदाजीमध्ये आम्ही अधिक चांगली कामगिरी केली. खेळपट्टी पाहता ऑस्ट्रेलियाचा संघ 180 पर्यंतची धावसंख्या गाठेल असा आम्हाला अंदाज होता. मात्र त्यांना 164 धावांवर रोखणे हे आमच्या गोलंदाजांचे कौशल्य आहे. असे म्हणत विराटने आपल्या गोलंदजांचेही कौतुक केले.

तर, ऑस्ट्रेलियन कर्णधार अँरॉन फिंच भारतीय संघाची प्रशंसा करताना म्हणाला, भारताच्या सलामीवीरांनी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जबरदस्त खेळ केला. रोहित आणि शिखर दोघांची खेळण्याची शैली खूप वेगळी असल्याने त्यांना रोखणे कठीण होते. त्यामुळेच त्यांची सलामी खूप प्रभावी ठरते. ते दोघे बाद झाल्यावर आम्ही चांगला खेळ केला. आमचे पुढील लक्ष्य ही कसोटी मालिकेमध्ये चांगला खेळ करणे आहे. पुढे बोलताना फिंच म्हणाला, खरेतर कसोटी मालिकेची खूप तयारी करायची गरज आहे आणि त्याला पुरेसा वेळही आहे. परंतु, आम्ही योग्य दिशेने पाउल उचलले असल्याने आम्ही समाधानी आहोत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)