त्यांचा अपघात झाला अन्‌ यांनी आखाड साजरा केला

  • पिकअप-कारची धडकेनंतर नागरिकांनी पळविल्या कोंबड्या

मंचर – अपघातानंतर बऱ्याचदा बघ्यांची संवेदनशीलता हरवते. असाच प्रकार मंचरच्या अवसरीजवळील हिंगेवस्तीत अनुभवयाला मिळाला.
मंचर-पारगांव रस्त्यावर हिंगे वस्ती-अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) जवळ कोंबड्यांची वाहतूक करणारी पिकअप गाडी व व्हॅंटो कारची समोरासमोर धडक झाल्याने पिकअपमधील 900 कोंबड्या मेल्या. तर जखमी झालेल्या 300 कोंबड्या रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी पळवून नेल्या. या अपघातात दोन्ही गाड्यांचे अंदाजे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. तर कोंबड्यांचे 1 लाख रूपये असे एकूण 4 लाख रूपयांचे नुकसान झाले. यावेळी खरे तर वाहनचालकांना मदतीची अपेक्षा असताना आखाडाचा शेवटचा दिवस असल्याची संधी बघ्यांनी साधली. अन्‌ मदत न करता थेट कोंबड्याच पळवल्या.
अपघाताची माहिती अशी की, मंचर-शिरूर रस्त्यावर हिंगे वस्तीजवळ कोंबड्यांची वाहतूक करणारी पिकअप (एमएच 03 सीपी 2183) 1200 कोंबड्या घेऊन मुंबईकडे चालली होती. या दरम्यान व्हॅटो कार (एमएच 12 एचएफ 6258) पारगावकडे चालली होती. दोन्ही गाडीच्या चालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने पिकअप व कारची समोरासमोर धडक झाली. यामध्ये पिकअप रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात पडल्याने 900 कोंबड्या मृत पावल्या. तर, 300 कोंबड्या नागरिकांनी पळविल्या. कारच्या चालकाच्या बाजुचा दरवाजा व स्टेरिंग लॉक झाल्याने व गाडीला एअर बॅंग असल्याने चालकाला कोणतीही हानी झाली नाही; परंतु यामध्ये कारचे एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)