तौसीफला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी लढा उभारु

तौसीफ शेख न्याय समितीची स्थापना अधिकारी, पुढारी, अतिक्रमण करण्यावर गुन्हा दाखल करा

नगर: कर्जत येथील दावल मलिक ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमणे काढण्यासाठी तौसीफ शेख या युवकाने आत्मदहन केले होते. यामध्ये तौसिफला जीव गमवावा लागला. त्यामुळे मुस्लीम सेवा संघाचे प्रवक्ते अमजद पठाण यांनी तौसीफचा लढा पूर्ण करण्यासाठी तसेच तौसीफवर झालेल्या अन्यायाविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन उभा करण्यासाठी कर्जत यथे राज्यस्तरीय इंसाफ अधिवेशन बोलावण्यात आले. या अधिवेशनासाठी मुस्लीम सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मासुलदार, मूलनिवासी मुस्लीम संघाचे अंजुम इनामदार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, मुस्लीम सेवा संघाचे प्रवक्ता अमजद पठाण, नगर पत्रकार संघाचे सय्यद वहाब, जब्बार, युनुस शेख, डॉ. परवेझ अशरफी, फय्याज शेख, रौफ शेख, इम्रान देशमुख, आदम सय्यद, युन्नुस शेख, कादारीया वेलफेअर सोसायटी जुन्नरचे रौफ खान, शहीद कुरेशी, राजेंद्र राऊत, किशोर मासाळ, नजीर सय्यद यांच्यासह राज्यभरातून मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी मुस्लीम सेवा संघाचे प्रवक्ता अमजद पठाण यांनी सांगितले की, तौसिफला न्याय मिळवून देण्यासाठी कर्जत, श्रीगोंदा जामखेड येथे रस्ता रोको आंदोलने करण्यात आली. राज्यात ठिकठिकाणी निवेदने देण्यात आली. मात्र अजूनही प्रशासन वेळ काढूपणा करत असून शासनाने आत्तापर्यंत कोणतीही आर्थिक मदत तौसीफच्या कुटुंबियांना दिलेली नाही. तसेच ट्रस्टच्या जागेवरील पक्की अतिक्रमणे अजूनही काढलेली नाही त्यामुळे आम्ही घेतलेल्या अधिवेशनामध्ये तौसिफला न्याय मिळवून देण्यासाठी शहीद तौसीफ शेख न्याय समिती या नावाने कृती समिती स्थापन करत असून या समितीच्या माध्यमातून राज्यव्यापी लढा उभारला जाणार आहे.

या समितीच्या अंतर्गत तीन उपसमिती असतील यामध्ये, वक्‍फ बोर्डच्या जागेसंदर्भात कायदेशीर लढाई लढणारी समिती, तौसीफला न्याय मिळवून देण्यासाठी, त्याच्या आत्मदहनासाठी जबाबदार अधिकारी, नेते त्यांच्याविरुद्ध कायदेशीर आणि संवेैधानिक लढा उभारणारी समिती आणि तौसीफच्या कुटुंबियांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करून देण्यासाठी निधी गोळा करणारी समिती अशा वेगवेगळ्या विभागात लढा उभा केला जाणार आहे. तौसीफ शेख यांनी आपल्या हयातीत 20 लोकांची कमिटी बनवून कायदेशीर लढा उभा केला होता त्या सर्व 20 सदस्यांना शहीद तौसीफ शेख न्याय समिती अंतर्गत सर्वोतोपरी मदत करण्यात येणार असून आंदोलनासाठी लागणारा पैसा सामाजिक आणि समविचारी संघटना व पक्ष एकत्रितपणे स्वतः करणार आहेत यासाठी कोणाकडेही निधी मागण्यात येणार नाही.

दरम्यान मुस्लीम सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मासुलदार यांनी तौसीफ शेख यांच्या कुटुंबियांना पक्के घर बांधून देणार असल्याचा ठराव या अधिवेशनमध्ये संमत केला. तसेच कादारीया वेलफेअर सोसायटी जुन्नरचे रौफ खान यांनी तौसीफच्या दोन्हीही मुलींना दत्तक घेणार असून त्यांचा विवाहापर्यंतचा सर्व खर्च कादारीया वेलफेअर सोसायटी करणार असल्याचे जाहीर केले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस म्हणाले की, समितीच्या माध्यमातून आम्ही राज्यव्यापी काम करणार असून रस्त्यावरील लढाईत आम्ही अग्रणी राहणार आहोत. तौसीफच्या आत्मदहनास जबाबदार असणाऱ्या अधिकारी, पुढारी आणि अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. तौसीफ शेख यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी खाते क्रमांक 60321257897 बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा कर्जत या खात्यात आर्थिक मदत द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)