तौसीफच्या कुटुंबियांसाठी मदतीचा प्रस्ताव अडकला लालफितीत!

कर्जत प्रांताधिकारी कार्यालयाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावात त्रुटी

नगर: कर्जत येथील दावल मलिक ट्रस्टच्या जागेत झालेली अतिक्रमणे हटविण्यासाठी तौसीफ शेख या युवकाने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आत्मदहन करून स्वतःचे जीवन दहा दिवसापूर्वी संपविले. तौसीफच्या पश्‍चात त्याच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी, यासाठी कर्जत प्रांताधिकारी कार्यालयाला वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावात अनेक त्रुटी राहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातून पुन्हा कर्जत प्रातांधिकारी कार्यालयाकडे त्रुटी दूर करण्यासाठी पाठविण्यात आला आहे. कर्जतच्या प्रातांधिकारी कार्यालयाचा तौसीफ शेख आत्मदहन प्रकरण अजून गांभीर्याने घेतले नसल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कर्जतचा युवक तौसीफ शेख याने दावल मिलक ट्रस्टच्या जागेतील अतिक्रमणे काढावी, यासाठी दीर्घ लढा दिला. न्यायालयात देखील त्याच्या या लढ्याला न्याय मिळाला आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अतिक्रमणांवर कारवाई व्हावी, अशी त्याची मागणी होती. कर्जतच्या प्रातांधिकारी कार्यालयाकडे त्याने लेखी निवेदनाद्वारे अतिक्रमण हटविण्याची मागणी लावून धरली होती. त्यासाठी लेखी पत्रव्यवहार देखील केला होता. प्रातांधिकारी कार्यालयाकडून अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याचे पाहून, तौसीफ याने जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. यात तौसीफ याने आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. महापालिका निवडणुकांमुळे कारवाईला दिरंगाई होईल. त्यामुळे निवडणुका होताच कारवाई करू, असे आश्‍वासन तौसीफ याला देण्यात आले होते. यावर देखील कारवाई न झाल्याने तौसीफ याने मंगळवारी (ता. 18) जिल्हाधिकारी कार्यालयाला अतिक्रमणांवर कारवाई न झाल्यास गुरूवारी (ता. 20) आत्मदहन करू, असा इशारा दिला होता.

तौसीफच्या या इशारा जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही. परिणामी, त्याने गुरूवारी (ता. 20) आत्मदहन केले. त्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तौसीफ याच्या मृत्यूनंतर कर्जतमधील राजकारण चांगलेच ढवळून निघाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री प्रा. राम शिंदे व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तौसीफयांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सामाजिक व राजकीय संघटनांनी तौसीफच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी लावून धरली आहे. तौसीफच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी सहभागी करून घ्यावे, अशीही मागणी आहे.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी यादृष्टिने कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यानुसार कर्जतच्या प्रातांधिकारी कार्यालयाने तौसीफच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शनिवारी (ता. 29) दाखल झाला होता. या प्रस्तावाची तपासणी केल्यावर त्यात अनेक त्रुटी राहिल्याचे समोर आले. या त्रुटी दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव पुन्हा प्रातांधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. कर्जतच्या प्रातांधिकारी कार्यालयाने तौसीफचे आत्मदहन गांभीर्याने घेतल्याचे दिसत नसल्याचे हा प्रस्तावातील त्रुटींवरून दिसून येते, अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात रंगली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)