तो’ वाळुचा ट्रक सोडण्याच्या आदेशाचं गौडबंगाल काय ?

पोलिसांकडे तहसीलदारांचा बनावट आदेश : मोठ्या रॅकेटची शक्‍यता

पळशी, दि. 5 (वार्ताहर) – म्हसवड तलाठ्यांने 16 जून रोजी दौंड (जि.पुणे ) येथील एक बेकायदेशीर वाळू वाहतुक करताना पकडलेला ट्रक पोलिसांनी तहसीलदारांचा आदेश असल्याचे पत्र मिळाल्याने सोडून दिला. परंतु, तहसिलदारांनी तसा कोणताही आदेश दिला नसल्याचे सांगितले आहे. मग तो’ आदेश नक्की कोणी बनवला? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. यात मोठ्या रॅकेटची शक्‍यता वर्तवली जात असून आता जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालून यातील गौडबंगाल काय आहे त्याचा तपास करण्याची गरज आहे.
म्हसवडचे तलाठी अकडमल, शिरताव व वर-मलवडीचे तलाठी यांनी दि. 16 जून रोजी सकाळी साडेसात वाजता अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक (एमएच-12 -एमव्ही – 9095) जठरेवस्ती ते देवापूर रस्त्यादरम्यान पकडला होता. हा ट्रक 4 ब्रास वाळुसहित त्याचदिवशी म्हसवड तलाठी यांनी म्हसवड पोलिसांच्या ताब्यात दिला व 18 जूनला तलाठ्यांनी तसा पंचनामा व ट्रक पोलीसात जमा केल्याची पोहोच तहसीलदारांना सादर केली.
यानंतर दि. 10 जुलैला तहसीलदारांचे ट्रकवर कारवाई पूर्ण झाली असून ट्रक सोडण्यात यावा, असे आदेशपत्र आल्याने दि. 13 जुलै रोजी ट्रक सोडून दिला. मात्र, तहसीलदारांनी तसे कोणतेही पत्र काढले नसल्याचे समोर येत आहे. मग पोलिसांकडे तसे आदेशपत्र कोठून आले, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. म्हसवड पोलिसांकडे असलेल्या आदेशात जावक क्रमांक कर.गौ.ख/कावि/ 560/18 व दि. 10/07/2018 अशी नोंद आहे. मात्र, तहसीलदारांच्या जावक रजिस्टरमध्ये याच जावक नंबरवर दि. 26 जूनला गोंदवलेच्या धैर्यशील पाटील यांना माहिती दिल्याची नोंद आहे. त्यामुळे हा जावक नंबरही चुकीचा आहे. शिवाय पंचनाम्यात ट्रक जठरे वस्ती ते देवापुर रस्त्यावर पकडल्याची नोंद आहे तर आदेशावर म्हसवड-शिंगणापुर रस्त्यावर पकडलेला ट्रक सोडून द्यावा असा उल्लेख आहे. यापुर्वी तहसीलदारांनी सोडलेल्या वाहनांच्या आदेशावर 2/- उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून अशी सुरवात असते मात्र या पत्रावर 1/- अशी सुरवात केली आहे. याचा अर्थ तहसीलदारांची सही स्कॅनिंग करून ते बनावट पत्र बनवले गेले आहे. पत्रावर जावक नंबरची झेरॉक्‍स दिसून येत आहे. याचा अर्थ महसूलने पत्र बनवले नसल्याची दाट शक्‍यता आहे. याप्रकारे किती वाहने सोडली आहेत? पत्र बनवणारा मास्टर माईंड कोण याचा तपास जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालून चौकशी करण्याची गरज आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोठ्या रॅकेटची शक्‍यता
तहसीलदारांनी 9 जुलैला सयाजी वाघमोडे ( रा. माळशिरस) यांचा जावक क्रमांक – 559 नुसार ट्रक सोडण्याचे आदेश दिले होते. या पत्रात विषयमध्ये वाहन हा शब्द दोन वेळा आला आहे. 10 जुलै तारीख असलेल्या बनावट पत्रातही तसाच उल्लेख असून खटावचे तहसीलदार बेल्हेकर यांची सही आहे. परंतु, 9 जुलैपासून तहसीलदार जयश्री आव्हाड यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. बनावट पत्रावर बेल्हेकरांची सही आहे. याचा अर्थ पत्र फोटोशॉपमधुन त्या पत्राची कॉपी करून बनवले आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश माणच्या तहसीलदारांना दिले असून दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार आहे.
– दादासाहेब कांबळे , प्रांताधिकारी.

 

माझ्याकडे माणचा अतिरिक्त कार्यभार असताना तहसील कार्यालयातील रजिस्टर व इतर नोंदी पाहता हा ट्रक सोडण्याचा आदेश काढला नाही.
– सुशिल बेल्हेकर , तहसिलदार, खटाव .

 

ट्रकधारकाने तहसीलदार यांच्या सहीचे पत्र दिल्याने ट्रक सोडण्यात आला आहे.

– मालोजीराजे देशमुख , सपोनि, म्हसवड.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)