“तो’ रस्ता नऊ मीटरचाच करा

नगरसेविका माया बारणे यांचे पालिका आयुक्‍तांना साकडे

वाकड – थेरगाव सर्वे नंबर 29 मधील मुख्य रस्त्यापासून आतील गृह प्रकल्पांकडे जाणारा रस्ता बारा मीटरचा करण्यास मूळ जमीन मालकांनी कडाडून विरोध दर्शवल्याने हा रस्ता नेमका किती रुंद होणार? असा प्रश्न या ठिकाणच्या सोसायट्यामध्ये वास्तव्यास आलेल्या शेकडो नागरिकांसमोर पडला आहे. दरम्यान स्थानिक नगरसेविका माया संतोष बारणे यांनी पालिका आयुक्‍त यांच्याकडे हा रस्ता नऊ मीटरचाच करावा, अशी मागणी केली आहे.
नगरसेविका माया बारणे यांनी नुकतीच पालिका आयुक्‍त श्रावण हार्डीकर यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सर्वे नंबर 29 थेरगाव येथे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागामार्फत अनेक बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम परवानगी दिलेली असून या परिसरात पुढील बाजूस अनेक गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. शेकडो नागरीक या ठिकाणी वास्तव्यास ही आले आहेत. मात्र त्यांना जाण्यासाठी हक्काचा पुरेसा रस्ताच उपलब्ध नसल्याने गैरसोय होत होती. यावेळी स्थानिक मूळ जमीन मालकांनी पुढील सोसायट्यांचा रस्त्याचा प्रश्‍न सुटावा या हेतुने आपली नऊ मीटर जागा रस्ता करण्याच्या बोलीवर बांधकाम व्यावसायिकांस दिली. ताबासुद्धा बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आला आहे. मात्र एका स्थानिक नगरसेवकाने बांधकाम व्यवसायिकाच्या फायद्यासाठी हा रस्ता बारा मीटरचा होत असल्याचे घोषित केल्याने याला मूळ जमीन मालकांनी विरोध केला आहे, असे माया बारणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे .

हा रस्ता नऊ मीटरचा करण्यासाठीच मूळ जमीन मालकांनी आपल्या जागेचा ताबा संबधित बांधकाम व्यवसायिकास यापूर्वीच दिला आहे, ही बाब बारणे यांनी आयुक्‍तांच्या निदर्शनास आणून दिली असल्याने याची तत्काळ दखल घेत सदरचा रस्ता हा नऊ मीटरचाच करण्यात यावा, असे आदेश पालिका आयुक्‍तांनी स्थापत्य विभागास दिले असल्याचा दावा माया बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)