…’तो’ निव्वळ प्रँक व्हिडिओ

हैदराबाद : : वेगाने धडधडत येणाऱ्या ट्रेनसमोर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना इंजिनच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा एक व्हिडीओ काही दिवसापूर्वी सर्वांसमोर आला होता. मात्र  व्हिडीओ आता केवळ प्रँक व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे.
तेलंगणामध्ये राहणारा जिम इन्स्ट्रक्टर शिवा आणि त्याच्या मित्रांनी अख्ख्या जगाला मूर्खात काढल्याचे समोर आले आहे. कारण ‘तो’ व्हिडिओ म्हणजे निव्वळ एक प्रँक व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. तो संपूर्ण व्हिडिओ बनावट असून शिवाला कधी ट्रेनने उडवलेच नाही, इतकेच काय, तो साधा रेल्वे ट्रॅकजवळही उभा राहिला नाही, असे सांगण्यात येत आहे, एबीएन तेलुगू नावाच्या स्थानिक वृत्तवाहिनीने शिवा आणि त्याचे मित्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पाहून हसत-खिदळत असल्याचे दाखवले आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर शिवा परागंदा झाला होता. ट्रेनच्या धडकेत शिवाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, असे म्हटले जात होते. मात्र हा निव्वळ बनाव असल्याचे आता समोर आले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)