तो निधी अमेरिका आमचे देणे लागते – पाकिस्तानचा दावा

इस्लामाबाद – अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी तीनशे दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला पाकिस्तानने आक्षेप घेतला आहे. या संबंधात पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी म्हटले आहे की अमेरिकेकडून आम्हाला मिळणारा हा निधी म्हणजे मदत नव्हती तर दहशतवादाच्या विरोधातील युद्धात आम्ही त्यांना जे सहकार्य दिले त्याबद्दलची ती आमची भरपाई होती. म्हणजेच अमेरिका आमचे ते पैसे देणे लागते असे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेने हा निर्णय जाहीर केल्यानंतर कुरेशी यांनी एक तातडीने पत्रकार परिषद बोलावून हा दावा केला. ते म्हणाले की आम्ही आमची ही भूमिका अमेरिकेला पटवून देऊ. त्यांचे विदेश मंत्री येत्या 5 सप्टेंबरला पाकिस्तानच्या दौऱ्यावर येत आहेत त्यावेळी त्यांच्याशी होणाऱ्या चर्चेत आम्ही त्यांना ही बाब सांगू असे ते म्हणाले. ते तीनशे दशलक्ष डॉलर्स ही मदत नव्हती किंवा अमेरिकडून आम्हाला दिले जाणारे ते सहाय्य नव्हते.

आम्ही दहशतवादाच्या विरोधातील लढाईत जो लष्करी खर्च केला त्यापोटी अमेरिका आम्हाला ते देणे लागत आहे. त्याची अमेरिकेने आम्हाला परत फेड केलीच पाहिजे. पण आता मात्र ते यातून हात आखडता घेत आहेत. हा पैसा आम्ही खर्च केला आहे तो अमेरिकेने आम्हाला परत देणे हे त्यांचे कर्तव्य आहे असेही ते म्हणाले. अफगाणिस्तान विरूद्धच्या युद्धात आणि दहशतवादाच्या विरोधात आम्ही अमेरिकेला सहकार्य करून आमच्या लष्करावर हा पैसा खर्च केल्यानंतर त्यांनी आता अशा प्रकारची भूमिका घेणे योग्य नाही असेही त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)