‘तो’ आरोपी विजय भटकर यांचा पुतण्या

नांदेड – नांदेडसह राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं असून, या प्रकरणी दोघा पोलिसांसह 20 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नांदेडच्या पोलिस भरती घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार हा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांचा जवळचा नातेवाईक असल्याचं समोर आलं आहे. विजय भटकरांनी स्थापन केलेल्या इटीएच कंपनीत तो अद्यापही कर्मचारी असल्याची माहिती आहे.

विजय भटकर यांच्या चुलत भावाचा मुलगा प्रवीण भटकर नांदेडच्या पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार असल्याचा आरोप आहे. त्याने ओएमआर नावाची स्वतःची कंपनी काढून डाटा कलेक्ट केला. त्यासाठी भटकरांच्या नावाचाही उपयोग केला. पुण्यातील बावधनमध्ये त्याने ओएमआर कंपनी काढून हे उद्योग केले.भटकर यांचं मूळ गाव अमरावतीमधील मुर्तीजापुर आहे. त्यामुळे प्रवीण भटकरही आपलं गाव अमरावती असल्याचं सांगतो.

-Ads-

डॉ. विजय भटकर यांनी प्रवीण इटीएचमध्ये काम करत असल्याचं मान्य केलं आहे. मात्र आपण तीन वर्षांपूर्वीच कंपनीचा राजीनामा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपल्या गावातील अनेक जण भटकर आडनाव लावत असल्याचं त्यांनी सांगितलं. घोटाळ्याच्या सूत्रधाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)