तोतया पोलिसांची रेल्वेत पाकीटमारी

पिंपरी – आकुर्डी रेल्वे स्थानकावर पोलीस असल्याची बतावणी करत प्रवाशांना लुटणाऱ्या दोन तोतया पोलिसांना नागरिकांनीच रंगेहात पकडत रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले.

राजू लक्ष्मण राठोड (वय-28, रा. आकुर्डी) व तानाजी धोंडीराम भंडारे (वय-35 रा. आकुर्डी) अशी तोतया पोलिसांची नावे आहेत.

-Ads-

आकुर्डी रेल्वे स्थानकावर दोघेजण पाकीटमारीच्या तपासाचे कारण देत प्रवाशांना दमदाटी करुन पैसे उकळत असल्याची माहिती प्राधिकरण नागरी सुरक्षा कृतीच्या कार्यकर्त्यांना मिळाली. रेल्वे कर्मचारी दत्ता खाडे आणि प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, पदाधिकारी अमित डांगे, संतोष चव्हाण, अमोल कानु यांनी त्वरित प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर धाव घेतली व ही बाब रेल्वे पोलिसांना कळवली. पोलीस मित्र जयेंद्र मकवाना, संजय प्रधान, रेखा भोळे, गौरी सरोदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक एम. आर, खान आकुर्डी स्थानकावर पोहचले. यांनी या दोघांना पकडत चौकशी केली असता ते तोतया पोलीस असल्याचे उघड झाले.

या संदर्भात समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, आकुर्डी रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांमुळे वर्दळ वाढत चालली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे तसेच प्राधिकरण परिसरामुळे दरोरोज रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत आहे. महाविद्यालयांमुळे विद्यार्थ्यांची संख्याही हजाराच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे गुंड आणि पाकीटमारांच्या गुन्हेगारीचा आलेखही आकुर्डी स्थानकावर वाढीस लागला आहे.दिवसाआड या ठिकाणी प्रवाशांवर तसेच त्याठिकाणी नियुक्त असलेल्या रेल्वे कमचाऱ्यांवरही हल्ले होत आहेत. यावर प्रतिबंधक उपाय म्हणून आरपीएफ जवानांबरोबर प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पोलीस मित्र रात्रीच्या वेळेस गस्त घालीत आहेत. परंतु दिवसाही आता गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. त्याकरिता रेल्वे प्रशासनाने आकुर्डी पोलीस स्थानकावर तात्काळ पोलीस मदत केंद्र किंवा पोलीस ठाणे कार्यान्वित करणे अत्यावश्‍यक आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)