तोतया पोलिसांकडून नागरिकांची फसवणूक

पिंपरी – पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत तोतया पोलीस व्यापाऱ्यांची फसवणूक करीत आहेत. मात्र अशा लोकांपासून सावध राहावे, असे आवाहन थेट पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी केले आहे.

शहरातील वेश्‍या व्यवसायावर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून सामाजिक सुरक्षा विभागाची स्थापना केली जाते. मात्र पिंपरी चिंचवड आयुक्तालयात अशा प्रकारच्या विभागाची अद्याप स्थापना केलेली नाही. अशा प्रकारच्या व्यवसायावर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस ठाण्याकडे दिली आहे. मात्र तोतया पोलीस सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत व्यापाऱ्यांची फसवणूक करीत असल्याचे दिसून आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामुळे अशा तोतया पोलिसांच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये. सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी असल्याचे सांगून कोणी आल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी अथवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नागरिकांनी याबाबत सहकार्य केल्यास संबंधीत घटनांवर आळा बसू शकेल, असा विश्‍वास आयुक्त पद्मनाभन यांनी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)