तोडफोड प्रकरणी चौघांना अटक

पिंपरी – वाल्हेकरवाडी येथे गाड्यांची तोडफोड करणाऱ्या चौघांना चिंचवड पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे.

याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात सागर काळभोर (वय-31, रा. आकुर्डी) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दुर्गेश अनिल सुर्वे (वय-25), सौरभ गोपाळ नढे (वय-20), हृषिकेश नामदेव बधाले (वय-21), नितीन प्रकाश लोंढे (वय-24, सर्व रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांना अटक केली आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील महाराजा डोअर्स या दुकानाच्या परिसरात रविवारी (दि. 29) सकाळी या चौघांनी धिंगाणा घालत दुकानाच्या दरवाजाची तोडफोड केली. परिसरातील नागरिकांनाही शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे चौघांनाही बेड्या ठोकल्या. याचा पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)